राज्यस्तरीय स्काऊटर गाईडर तथा प्रा. बापूसाहेब टी.पी. महाले स्काऊट गाईड जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ मा. ना. श्री. अशोकराव चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते दि. १५-३-२०१० रोजी घेण्यात आला.
१०६ स्काऊट व ७३ गाईड युनिटने पंतप्रधान ढाल स्पर्धेत सहभाग घेतला तसेच १ रोव्हर युनिटने उपराष्ट्रपती वार्ड स्पर्धेत नोंदणी केली आहे.
१६६ कबनी चतुर्थ चरण तर ११० बुलबुलनी हिरकपंख पदक प्राप्त केले. तसेच ७१ कब व ५६ बुलबुल सुवर्णबाण पदकाचे मानकरी ठरले.
८९२ स्काऊट्सने राज्य पुरस्कार प्राप्त केला तर १३ स्काऊट राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले.
राज्य संस्थेच्या वतीने राज्य प्रशिक्षण केंद्र व जिल्हा संस्थेच्या मागणीनुसार ३५ स्काऊट विभाग व ४८ गाईड विभागाकरिता विविध प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली. त्यामध्ये १५२० स्काऊट मास्तर , १४०८ गाईड कॅप्टनने सहभाग घेतला.
३० जिल्हा संस्थानी स्काऊट गाईड जिल्हा मेळावे आयोजित केले. त्यामध्ये ५८५४०स्काऊट्स,गाईड्सने सहभाग घेऊन सहजीवनाचा आनंद घेतला.
श्री. भा. ई. नगराळे, भा. प्र. से. (निवृत्त), डॉ. वसंतराव काळे, राज्य आयुक्त (स्का.), श्रीमती विजया देवरे, राज्य आयुक्त (गा.) व श्री. बी. सी. हंगे, मानद राज्य कोषाध्यक्ष यांनी विविध जिल्हासंस्था व स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यांना भेटी देऊन स्काऊट गाईडचे कौतुक केले. तसेच जिल्हासंस्थेचे पदाधिकारी यांना संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी मार्गदर्शन केले.
शनल कमिशनर वार्डच्या धर्तीवर, राज्यापातळीवर स्काऊट,गाईड गुणात्मक वाढीसाठी राज्य मुख्य आयुक्त ढाल स्पर्धा सुरु करण्यात आली.
१८ जिल्ह्यांनी कब, बुलबुल उत्सव घेतला त्यात ४,२०० कब, बुलबुलनी सहभाग नोंदविला.
२६ जानेवारी २०१० रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय संचलनात शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राज्यसंस्थेच्या वतीने उत्तर मुंबई म.न.पा. व दक्षिण मुंबई म.न.पा. या जिल्हा संस्थेतील ७५ स्काऊट्स, ७५ गाईड्सनी भाग घेऊन उत्कृष्ट संचालन केले.
पूढे वाचा...
|